विज्ञान भवन येथे रात्री शुक्रवारी ८ जानेवारीला दुपारी २ वाजता आंदोलन करणाऱ्या ४० शेतकरी संघटनांच्या नेत्यांसोबत होणाऱ्या बैठकीत काय होईल? हे आपण सांगू शकत नाही, असं तोमर म्हणाले.
शेतकरी संघटना आणि सरकारमधील तिढा सोडवण्यासाठी पंजाबच्या नानकसार गुरुद्वाराचे प्रमुख बाबा लखा यांच्याशी प्रस्तावावर चर्चा केली आहे का? तर असा कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही, असं तोमर यांनी स्पष्ट केलं. बाबा लखा हे राज्याचे प्रख्यात धार्मिक नेते आहेत. शुक्रवारी होणाऱ्या संभाव्य बैठकीच्या निकालांबद्दल तोमर यांना विचारले गेले. यावर आत्ता काहीच बोलू शकत नाही. बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा होते यावर अवलंबून आहे, असं तोमर म्हणाले.
‘ट्रॅक्टर मार्च’ ही रंगीत तालीम
शेतकरी संघटनांनी गुरुवारी ट्रॅक्टर मार्च काढला. सिंघू, टिकरी आणि गाजीपूर सीमा तसंच हरयाणाच्या रेवासनपासून ट्रॅक्टर मार्च काढला. २६ जानेवारीला होणाऱ्या ट्रॅक्टर परेडची ही रंगीत तालीम आहे, असं शेतकरी म्हणाले.
मी सर्वांना भेटेल, मग ते शेतकरी असोत वा नेते. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीशिवाय कोणत्याही प्रस्तावावर विचार केला जाईल. राज्यांना नवीन कृषी कायदे लागू करण्यावर सूट देणारा कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही. बाबा लखा यांच्याशी आपलं बोलणं सुरूच आहे. ते आज ( गुरुवारी ) दिल्लीला आले आहेत, याची बातमी आहे. आपले त्यांच्याशी जुने संबंध आहेत, असं तोमर म्हणाले. आंदोलन करणारे शेतकरी आणि सरकारमध्ये मध्यस्थी करण्यासाठी धार्मिक नेत्यांना भेटणार का? असा प्रश्न तोमर यांना केला गेला. मी त्यांची भेट घेईन, मग ते शेतकरी असोत की नेते, असं तोमर म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times