म. टा. प्रतिनिधी, : मानाच्या अखिल मंडई गणपती मंदिराच्या लोखंडी दरवाजाची कडी उचकटून चोरट्यांनी मंदिरातील मूर्तीवरील दोन सोन्याचे हार चोरून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली. तसेच जाताना दानपेटी फोडून रोकडही लंपास केली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

मंडईचा गणपतीच्या मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या दरवाजाची कडी उचकटून चोरटा आतमध्ये शिरला. गणपतीच्या मूर्तीवरील दोन हार चोरले. तसेच जाताना मंदिरासमोरील दानपेटी देखील फोडल्याचे समोर आले आहे. मंदिराचे पुजारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मंदिरात आल्यानंतर हा चोरीचा प्रकार समोर आला. त्यानी तात्काळ मंडळाच्या पदाधिकारी यांना घटनेची माहिती दिली. तात्काळ मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. त्यांनी पोलिसांना कळविले.

विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. या ठिकाणी शुक्रवारी पहाटे एक चोरटा मंदिरात शिरला. त्याने दोन सोन्याचे हार व दानपेटी फोडून त्यामधील पैसै चोरून नेल्याचे दिसत आहे. हे दोन हार २० ते २२ तोळे वजनाचे होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here