नाशिक: मधल्या काळात भाजपमध्ये गेलेले माजी आमदार वसंत गिते व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांनी आज पुन्हा एकदा स्वगृही परतत भगवा झेंडा खांद्यावर घेतला. शिवसेना नेते, खासदार यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राऊत यांनी भगवी शाल देऊन दोन्ही नेत्यांचं पक्षात स्वागत केलं. या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशामुळं नाशिकमध्ये शिवसेनेला मोठं बळ मिळणार आहे. (Vasant Gite, Sunil Bagul Join Shiv Sena)

वाचा:

भाजपमधील अंतर्गत राजकारणामुळं गिते व बागुल अडगळीत फेकले गेले होते. त्यामुळं ते नाराज होते. गिते यांनी अलीकडेच ‘मिसळ पार्टी’ देऊन पक्षांतराचे संकेत दिले होते. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या. खासदार संजय राऊत यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर गिते व बागुल यांनी मुंबई ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर आज दोघांनीही पक्षांतर केले.

वाचा:

गिते व बागुल यांचा पक्षप्रवेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची चर्चा होती. मात्र, हा सोहळा नाशिकमध्येच झाला. याबाबत संजय राऊत यांनी खुलासा केला. ‘नाशिकमध्ये राजकीय प्रवाह बदलतो आहे. अनेक जुने शिवसैनिक परत येताहेत. त्यामुळं हा प्रवेश सोहळा नाशिकमध्ये होणं महत्त्वाचं होतं. शहर पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला करण्याची जबाबदारी या दोघांवर आहे, असं राऊत म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here