वाचा:
गिते आणि बागूल हे सध्या भाजपमध्ये विजनवासात आहेत. मागील कार्यकारिणीत दोघांकडे प्रदेश उपाध्यक्षपद होते. परंतु, नव्या कार्यकारिणीत दोघांना पदावरून हटवण्यात येऊन पक्षात आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे राजकीय वजन वाढविण्यात आले. त्यामुळे ते नाराज होते. अलीकडेच गिते यांनी सर्वपक्षीय समर्थकांना ‘मिसळ पार्टी’ देऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. तेव्हाच ते वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
वाचा:
गिते व बागुल यांनी दोनच दिवसांपूर्वी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल रात्री त्यांनी नाशिकमध्ये नेते, खासदार यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली. संजय राऊत हे आज पत्रकार परिषद घेऊन गिते व बागुल यांच्या शिवसेना प्रवेशाची घोषणा करणार आहेत. त्यांनतर सायंकाळी ६ वाजता वर्षा बंगल्यावर ठाकरे यांच्या उपस्थितीत दोघे शिवबंधन हाती बांधणार आहेत.
वाचा:
राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस हे तीन दिवसानंतर नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या नियोजित दौऱ्यापूर्वी आज भाजपला धक्का बसला आहे. गिते व बागुल यांच्या पक्षांतरानंतर नाशिकमधील स्थानिक राजकीय समीकरणे बदलणार असून भाजपचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
भाजपला तिसरा धक्का
दोघांच्या शिवसेना प्रवेशामुळं नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच भाजपला तिसरा धक्का बसला आहे. भाजपचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. त्यामुळं भाजपच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाटील हे देखील आज शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times