वॉशिंग्टन: अमेरिकन संसद इमारत असलेल्या कॅपिटल हिलमध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या हिसांचारा प्रकरणी ५२ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर अमेरिकेतील राजकीय वातावरण आणखीच तापले आहे. अमेरिकेतील राजकीय घडामोडींना वेग आला असून ट्रम्प यांच्या गच्छंतीची मागणी होत आहे. जाणून घ्या अपडेट्स:

>> लाइव्ह अपडेट्स:
>> अमेरिकेतील संसदेमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संसद सदस्यांनी पोलिसांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी

>> ट्रम्प समर्थकांच्या हिंसाचारात जखमी झालेल्या पोलिसाचा मृत्यू

>> वाचा:

>> ट्रम्प यांना पदावरून हटवा, अन्यथा महाभियोग आणणार

> ट्रम्प यांची गच्छंती करा; २००हून अधिक खासदारांची मागणी>

>> वाचा:

> कायद्याने झालेल्या निवडणुकांच्या निकालाबाबत विद्यमान अध्यक्ष बेछूट आणि धादांत खोटे आरोप करीत आहेत. ही घटना देशासाठी अपमानास्पद आणि लाजिरवाणी आहे. ही घटना अचानक घडली, असे आपण मानत असू, तर ती स्वत:चीच केलेली फसवणूक असेल: बराक ओबामा

> संसदेवरील हल्ला आणि जनमताचा आदर करण्याचा प्रयत्न तेच करू शकतात, जे खोट्यावर आधारित आशा बाळगून आहेत. याचा देशाच्या नावलौकिकाला फटका बसून शकतो. : जॉर्ज डब्लू बुश, अमेरिकेचे माजी अध्यक्ष

> ही घटना अत्यंत वेदनादायी आहेत. ही राष्ट्रीय हानी असून ती आपल्या मूळ स्वभावाला धरून नाही. तरीही, आपण पुन्हा एकत्र येऊन शांततेने देशासाठी कायद्याच्या मार्गावर चालू शकतो आणि आपण ते करायलाच हवे. : जिमी कार्टर, अमेरिकेचे माजी अध्यक्ष

>

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here