मुंबई: ‘घाडगे अँड सून’ या मालिकेतू घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री लिमये लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटातून भाग्यश्रीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री होणार आहे. अभिनेता याची मुख्य भूमिका असलेल्या ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरू आहे. मिलाप झवेरी दिग्दर्शन करत असलेल्या या चित्रपटात भाग्यश्रीची देखील महत्त्वाची भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे.

‘श्रावणक्वीन’
भाग्यश्रीच्या या प्रवासाला सुरुवात झाली ती २०१४ची मटा श्रावणक्वीन झाल्यापासून. ‘घाडगे अँड सून’मध्ये प्रमुख व्यक्तिरेखा साकारायची संधी मिळाली आणि या क्षेत्रातली वाटचाल सुरू झाली.

जॉन तिहेरी भूमिकेत
पहिल्या भागाच्या यशानंतर निर्मात्यांनी या सिनेमाचा दुसरा भाग तयार करण्याचा निर्णय घेतला .जॉन अब्राहम या चित्रपटात दुहेरी नाही, तर चक्क तिहेरी भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जातंय. जॉननं यावर सांगितलं, की ‘सिनेमाचे अद्याप काही पात्रांवर काम करत आहेत. मी इतरही भूमिकेमध्ये दिसू शकतो. मात्र, ती कोणती असेल यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here