पंकज छल्लाणी (रा. मुकुंदनगर, पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने अनेकांना गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. काही दिवस परतावा दिल्यानंतर पैसे देणे सोडून दिले. आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे ३५ जणांचे तक्रार अर्ज आले आहेत. छल्लाणी हा व्यावसायिक असल्याचे सांगत असून, त्याच्यावर दत्तवाडी पोलिस ठाण्यातही पूर्वी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली. भोसलेनगर परिसरातील रिचर्ड अंची (वय ५८, रा. भोसलेनगर ) यांच्या तक्रारीवरून छल्लाणी यांच्या विरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
एका व्यक्तीने २५ लाखांपासून ते पाच कोटी रुपयांपर्यंत पैशांची गुंतवणूक केली आहे. ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे, त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times