लखनऊ: एटीएसने पाकिस्तानसाठी करणाऱ्या भारतीय लष्करातील निवृत्त जवानाला हापूड येथून अटक केली आहे. लष्कराच्या गुप्तवार्ता विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे एटीएसने हाथरस येथून सहा महिन्यांपूर्वी निवृत्त झालेल्या लष्कराच्या जवानाला अटक केली.

सौरभ शर्मा असे अटक केलेल्या निवृत्त जवानाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शर्मा हा हापूडचा रहिवासी आहे. २०१६ मध्ये तो पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या संपर्कात होता. त्याने लष्करातील गोपनीय कागदपत्रे पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेला पुरवले होते. पाकिस्तानी गुप्तचर संघटनेकडून त्या मोबदल्यात त्याला पैसे दिले जात होते. त्याची चौकशी केली असता, तो २०१४ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेच्या संपर्कात आला होता. तिने त्याच्याकडे एका घटनेसंदर्भात माहिती मागितली होती.

हेरगिरी करणाऱ्या निवृत्त जवानाने त्यावेळी लष्करातील गोपनीय माहिती दिली होती. गेल्या चार वर्षांपासून तो माहिती पुरवत होता. हा जवान जून २०२०मध्ये निवृत्त झाला होता, अशी माहिती समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, ६ जानेवारीला एटीएसने उत्तर प्रदेशातील खलिलाबाद, बस्ती आणि अलीगढसह पाच ठिकाणी छापेमारी केली होती. यात संतकबीर नगर येथून अझीझ उल हक या रोहिंग्याला अटक केली होती. तो भारतात अवैधरित्या वास्तव्यास होता. झडती घेतली असता, त्याच्याकडे बनावट कागदपत्रे सापडली होती. अझीझच्या खात्यात वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसे जमा करण्यात आले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here