असं सांगितलं जात आहे की बुधवारी प्रियांका चोप्रा, तिची आई मधु चोप्रा आपल्या पाळीव कुत्र्यासोबत लक्झरी सलूनमध्ये जाताना दिसल्या. यानंतर त्यांना पोलिसांनी अडवलं. नियमांचा हवाला देऊन पोलिसांनी सलून मालकाचीही चौकशी केली. मात्र, पोलिसांनी त्यांना दंड ठोठावला नाही. त्यावेळी तिथे सिलेब्रिटी स्टायलिस्ट जोश वुडही उपस्थित होते.
प्रियांकालाही या प्रकरणी कोणताही दंड आकारण्यात आला नाही. याचं मुख्य कारण म्हणजे तिने पोलिसांना सिनेमाशी निगडीत काही कागदपत्र दाखवली. तसंच त्या सिनेमासाठी तिला केस रंगवायचे होते. याचसाठी ती सलूनमध्ये जात असल्याचं सांगितलं. यानंतर, प्रियांकाच्या प्रवक्त्याने यासंबंधी खुलासाही केला. त्यांनी म्हटलं की, प्रियांका सध्या एका सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे. ते सलूनही फक्त प्रोडक्शन हाउससाठी उघडण्यात आलं होतं. यासोबतच सर्व सरकारी मार्गदर्शक सूचना पाळल्या होत्या. दरम्यान, प्रियांका आणि निक जोनस दोघंही लंडनमध्ये आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times