मुंबई : अभिनेता याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी ६ जानेवारी २०२१ रोजी उल्लेखनीय कामगिरीसाठी विशेष सत्कार करण्यात आला. गेल्या वर्षात म्हणजे २०२० मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, अशा मान्यवरांचा सत्कार यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आला.

राज भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात स्वप्निल जोशीला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं. त्यांच्याबरोबरच पोलीस कर्मचारी-अधिकारी, पत्रकार, डॉक्टर यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

स्वप्निल जोशी हे आज मराठी आणि हिंदी चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातील एक आघाडीचं नाव आहे. वयाच्या नवव्या वर्षी ‘उत्तर रामायण’ या हिंदी मालिकेत कुशची भूमिका सकारात त्यांना रुपेरी दुनियेत प्रवेश केला आणि त्यानंतर मागं वळून पाहिलं नाही. त्यानंतर त्याने ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ यांसारख्या लोकप्रिय मालिका आणि दुनियादारी, मुंबई-पुणे-मुंबई यांसारखे गाजलेल्या चित्रपटात काम केलं.

‘माझ्या मनोरंजन क्षेत्रातील कामाची नोंद घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे गौरव करण्यात आला, त्याबद्दल मी पत्रकार संघाचे आभार मानतो. हा सत्कार माननीय राज्यपालांच्या हस्ते झाल्याने त्याचे महत्व मोठे आहे. या पुरस्कारामुळx माझ्यासारख्या कलाकाराला एकप्रकारचा हुरूप येतो’, असं स्वप्निल म्हणाला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here