बाळासाहेब थोरात म्हणाले…
छत्रपती संभाजी महाराज हे आमचेही श्रद्धास्थान आहे. पण औरंगाबाद नामांतराला काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेसने आपली भूमिका बदललेली नाही. नामांतराला काँग्रेसला विरोध कायम आहे. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमानुसार सरकार चाललं पाहिजे, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद नामांतरावर शिवसेनेची भूमिका अधिक ठळकपणे मांडत याचं समर्थन केलं. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वक्तव्यावरही थोरात यांनी उत्तर दिलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद नामांतराचं समर्थन केलं आहे. या मुद्यावर महाविकास आघाडीत चर्चा करू. आम्ही सर्वपक्ष बसून यावर मार्ग काढू. महाविकास आघाडीचे नेते बैठक घेऊन चर्चा करतील, असं थोरात म्हणाले. यासोबतच काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतराचा ठाम विरोध आहे, असंही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला
औरंगाबदचे संभाजीनगर असे नामांतर करण्याची शिवसेनेची मागणी जुनीच आहे. यात नवीन काही नाही. तसंच औरंगजेब हा धर्मनिरपेक्ष नव्हता. यामुळे औरंगजेब हा धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस काय करणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटरवरील अधिकृत हँडलवरून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला. यावर चौकशी केली जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पण आज उद्धव ठाकरे यांनी उघडपणे औरंगाबादच्या नामांतराचं समर्थन केलं. त्यातचं काँग्रेसनेही भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं. आता राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेतील या दोन्ही पक्षांची समजूत कशी काढणार? राष्ट्रवादी काँग्रेस खास करून पाक्षचे अध्यक्ष शरद पवार यात मध्यस्थी करणार का? दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times