सोनू सूद शुक्रवारी शिर्डीत आला होता. त्याने साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांनी त्याला या विषयावर बोलते केले असात त्याने यावर अधिक भाष्य करणे टाळले. यापूर्वीही सूद याने आपल्यावर लावलेले आरोप फेटाळले होते. त्याच्याविरूद्ध ही कारवाई अकासाने केली जात असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमिवर सूद मात्र याकडे फारसे गांभीर्याने पहात नसून त्याने आज हा मुद्दा क्षुल्लक असून त्यावर अधिक बोलणेही टाळले आहे.
दरम्यान, शिर्डीत दर्शन घेतल्यानंतर सूद याने कोपरगावला भेट दिली. कोपरगाव नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सूदतर्फे शंभर स्मार्ट फोन भेट देण्यात आले आहेत. करोना काळात गरीब विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद पडू नये, यासाठी त्याने हे स्मार्ट फोन दिले आहेत. गरज पडली तर आणखी फोन देण्याची तयारीही त्याने दर्शविली. कोपरगावमधील एम. के. आढाव विद्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी सूद याचा कोपरगाव नगरपालिकेतर्फे करोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला. आपण अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी कोपरगावलाच निघालो होतो. आपला येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात नंबर लागला होता. मात्र, नागपूर मार्गे कोपरगावला येत असताना नागपूरमध्येही नंबर लागल्याचे कळाले, त्यामुळे कोपरगावला येणे टळले, अशी आठवणही सूद याने यावेळी सांगितली.
कोपरगाव नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सूदतर्फे शंभर मोबाइल भेट देण्यात आले
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times