तांबे यांनी ‘दोन दिवसांपासून सूर्य दिसला नाही… विकला तर नसेल ना…’ असे ट्वीट करून #मोदीहैतोमुमकिनहै असा हॅश टॅग देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. अनेकांना त्यांची ही गमतीदार राजकीय संदर्भ असलेली पोस्ट आवडली. अनेक सरकारी कंपन्यांची होत असलेली विक्री, खासगीकरणाला प्रोत्साहन देण्याचे धोरण यावरून काँग्रेस आणि अन्य विरोधकांकडून मोदींवर टीका केली जाते. सध्याच्या वातावरणातून केल्या जाणाऱ्या गमतीचा आधार घेत त्याच भाषेत अशी टीका करण्याचा प्रयत्न तांबे यांनी केल्याचे दिसून येते. अनेकांनी लाईक करून आपली मतेही नोंदविली आहेत. मात्र, बऱ्याच जणांनी यावरून त्यांनाच घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यावर आलेली उत्तरे पाहून अनेकांनी ही तांबे यांची पोस्ट चांगलीच झोंबल्याचे दिसून येते. मोदींकडे असलेला हा निशाणा काँग्रेसवर उलटविण्याचा प्रयत्न करणारी उत्तरे अनेकांनी दिली आहेत. सूर्याचे माहिती नाही, मात्र राज्यात सरकार स्थापनेपासून काँग्रेस दिसत नाही, विकली की काय मोदी शेठने. दोन वर्षे झाले स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत सरकार विकायला काढले की काय. विकला जायला सूर्य काँग्रेस आमदार थोडाच आहे. सूर्य आज ना उद्या दिसेलच औरंगाबादचे संभाजीनगर कधी करताय सांगा. दहा दिवसांपासून शेतकऱ्यांना सोडून काँग्रेसचे भावी अध्यक्ष दिल्ली सोडून कुठे गेले, त्यामुळे सूर्य देवता रुसून बसले असेल. राज्यस्तरावर काम करणाऱ्या नेत्याला असे जोक करणे शोभा देत नाही. सूर्य तर खूप लांबचा झाला आम्हाला ७० वर्षात काश्मिर दिसत नव्हता. अशा अनेक कॉमेंट्स करण्यात आल्या आहेत.
तर काहींनी पाठिंबा देणऱ्या कॉमेंटसही केल्या आहेत. गुजरातमधे चेक करायला पाहिजे कदाचित तिकडे ट्रांसफर केला असेल. मोदींची सूर्याकडे बघायची पण पात्रता नाही, तर सूर्य काय विकणार? अशा काही कॉमेंटस केल्या आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times