बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने () अभिनेता अर्जुन रामपालवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे. अंमली पदार्थ सेवन प्रकरणात अर्जुनची बहीण कोमल हिची देखील चौकशी करण्यात आली आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर एनसीबीने अंमली पदार्थांविरुद्ध जोमाने मोहीम सुरू केली होती. नोव्हेंबरमध्ये अर्जुन रामपालच्या खार येथील घरावर छापा टाकण्यात आला होता. त्या वेळी त्याच्याकडे प्रतिबंधित औषधे सापडली होती. त्या औषधांचे प्रीस्क्रिप्शन त्याने एनसीबी अधिकाऱ्यांना दाखवले. मात्र, ते जुने असल्याचे एनसीबीच्या तपासात पुढे आले. त्यामुळेच अर्जुनची २१ डिसेंबरला पुन्हा चौकशी झाली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आता कोमलचीही चौकशी सुरू केली आहे.
एनसीबीतील सूत्रांनुसार, अर्जुन हा प्रतिबंधित औषधांचे अर्थात अंमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, तो अंमली पदार्थांची दलाली किंवा विक्रीचे काम करतो का, याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठीच त्याच्याशी संबंधितांची चौकशी केली जात आहे. गरज भासल्यास त्याला पुन्हा चौकशीला बोलवले जाण्याची शक्यता आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times