नवी दिल्ली: पक्षांद्वारे माणसांमध्ये आणि माणसांद्वारे पक्षांमध्ये बर्ड फ्लूचा () संसर्ग होणे तितकेचे सहज नाही. असे असले तरी डॉक्टरांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. यात कच्चे आणि अर्धवट चिकन न खाण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. एव्हिएन इन्फ्लुएंझाचा संसर्ग झालेल्या पक्षांच्या मल, लाळ आणि स्त्रावाद्वारे माणसांमध्ये पसरू शकतो. यामुळे सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

संक्रमित जागांच्या संपर्कात येणे टाळावे

पॉल्ट्रीच्या पक्षांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक संशयित जागेला स्वच्छ करून ती संसर्गमुक्त करणे अत्यंत आवश्यक असल्याचे फोर्टीस हॉस्पिटलच्या डॉ. जेसी सुरी यांनी सांगितले. स्वत:ला सुरक्षित ठेवणाऱ्या सर्वच साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. ग्लोव्हज वापरणे आवश्यक आहे, असेही सुरी म्हणाल्या. जर एखाद्या भागात पक्षांचा मृत्यू होत असेल, तर आसपासच्या लोकांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे, असे आणखी एक आरोग्य विशेषज्ञ म्हणाले. मृत पक्षांच्या जवळ जाऊ नये आणि तत्काळ ही माहिती संबंधित विभागाला कळवावी, असेही ते पुढे म्हणाले.

… तर होऊ शकतो

अमेरिकी बर्ड फ्लूचा विषाणू व्यक्तीच्या डोळ्यात, कानात आणि तोंडात पुरेशा प्रमाणात गेल्यास त्या व्यक्तीला हा आजार होऊ शकतो, असे रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने म्हटले आहे. जर हा विषाणू हवेत पसरलेला असेल, आणि एखाद्या व्यक्तीने तेथे श्वास घेतला किंवा त्याने संक्रमित गोष्टींना स्पर्श केल्यानंतर स्वत:च्या डोळ्यांना, नाकाला आणि तोंडाला स्पर्श केला तर त्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो, असे केंद्राने म्हटले आहे.

बर्ड फ्लूची लक्षणे काय आहेत?

एखाद्या व्यक्तीला झाल्यास त्याला छोट्या आजारांपासून ते गंभीर आजारही होऊ शकतात. ताप, खोकला, गळा कोरडा होणे, नाक वाहणे, मांसपेशींमध्ये वेदना, अस्वस्थता, डोकेदुखी, डोळे लाल होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी बर्ड फ्लूची लक्षणे दिसू शकतात. गर्भवती महिला, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणारे आणि ६५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.

क्लिक करा आणि वाचा-

भारतात केव्हा, कोणत्या राज्यात झाला होता बर्ड फ्लूचा संसर्ग
भारतात पहिल्यांदा H5N1 या विषाणूने फेब्रुवारी २००५ मध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तांडव केले होते. दुसरी घटना मार्च २००६ मध्ये मध्य प्रदेशातील होती. तेव्हापासून देशाच्या विविध भागामध्ये बर्ड फ्लूचे रुग्ण सापडले होते. यात २००७ मध्ये मणिपूर आणि २००८ मध्ये पश्चिम बंगालचा समावेश आहे. सन २०१६ मध्ये प्राणीसंग्रहालय, हौजखासचा हरिण पार्क आणि तुघलकाबादच्या असोला भट्टी विहार येथे पक्षांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here