मुंबई: भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला आग लागून १० नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. तसंच, या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. (CM On Bhandara Hospital Fire)

भंडारा जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांसाठी असलेल्या दक्षता विभागात शुक्रवारी मध्यरात्री अचानक आग लागली. त्यात दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळं महाराष्ट्र हादरला असून सरकारी रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री यांच्याशी चर्चा करून संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला असून तपासाचे निर्देश दिले आहेत.

वाचा:

मृत बालकांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

मृत बालकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे सायंकाळी पाच वाजता रुग्णालयाला भेट देणार आहेत. मृत बालकांपैकी सात जणांचा मृत्यू धुराने गुदमरून झाला असून तिघे आगीत होरपळून मरण पावले आहेत. बालकांचे मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकशीत दोषी आढळलेल्यांवर निश्चितच कठोर कारवाई केली जाईल आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून राज्यातील अन्य सर्व रुग्णालयातील शिशू दक्षता विभागांचे तातडीनं ऑडिट करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना दिले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here