वाचा:
पश्चिमेकडील इमारतीत राहतात. अपंग असलेल्या गिरी यांची पत्नी आणि मुलगी मंगळवारी ५ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडताच दबा धरून बसलेल्या ३ दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. पाठमोऱ्या बसलेल्या गिरी यांना काही समजण्याच्या आतच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवून त्यांचे हात खुर्चीला बांधले व तोंडावर पट्टी चिकटवली. नंतर घरात शोधाशोध सुरू केली. इतक्यात त्यांची मुलगी घरात आली. दरोडेखोरांनी दरवाजातच तिला पकडून तिच्या तोंडाला पट्टी बांधून तिचे हात बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या मुलीने आरडाओरडा केला. आवाजाने शेजारी धावत आल्याने दरोडेखोरांचा प्लान फसला. पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी पळ काढला. मात्र मुलीबरोबर झालेल्या झटापटीत चोरट्यांच्या हातातून पडलेला फोन पोलिसांच्या हाती लागला. या फोनवरून पोलिसांनी माग काढत ठाण्यातून एका आरोपीला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरून, गिरी यांच्या इमारतीत राहणाऱ्या एका तरुणाने हा दरोड्याचा प्लान आखल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याला देखील अटक केली असून आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. मात्र फारशी रक्कम किंवा दागिने चोरीला न गेल्याने दरोड्याचा उद्देश नेमका काय होता याचा तपास पोलीस करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times