‘खाऊ तिथे आम्ही जाऊ’ अशा शीर्षकाची पोस्ट फेसबुकवर लिहून बाळा नांदगावकर यांनी गिते व बागुल यांच्यावर तोफ डागली आहे. आपल्या पोस्टमध्ये नांदगावकर म्हणतात, ‘दोन दिवसांपूर्वी येथील काही ‘अतिशय मोठे’ नेते बोलले की नांदगावकर, सरदेसाई, अभ्यंकर यांच्यामुळे पक्ष सोडला. हे तेच ‘मोठे नेते’ आहेत, ज्यांनी मनसेची चलती असताना शिवसेना सोडली, भाजपची सत्ता असताना मनसे सोडली, शिवसेनेची सत्ता असताना पुन्हा भाजप सोडला. एवढ्या “निष्ठावंत” नेत्यांवर काय बोलणार? ‘जिथे भेळ तिथे खेळ’ अशा प्रकारचं त्यांचं राजकारण आहे. ते त्यांनाच लखलाभ असो.’
वाचा:
‘राजकीय जीवनात असताना वैयक्तिक शेरेबाजी करणं शक्यतो मी कायमच टाळत आलो आहे, परंतु काही लोक आपली पायरी ओळखून राहत नाहीत म्हणून ही स्वाभाविक प्रतिक्रिया येते,’ असंही त्यांनी म्हटलं आहे. ‘गेल्या घरी सुखी राहा, अशा शुभेच्छा व मैत्रीपूर्ण सल्लाही नांदगावकर यांनी गिते व बागुल यांना दिला आहे.
वसंत गिते व सुनील बागुल हे मूळचे शिवसैनिक. मनसेची स्थापना झाल्यानंतर गिते यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर ते आमदार म्हणूनही निवडून आले. मात्र, मनसेचा राजकीय जोर ओसरताच त्यांनी भाजपला जवळ केले. पाठोपाठ सुनील बागुलही भाजपमध्ये गेले. तिथं त्यांना सुरुवातीला पक्षपातळीवर पदंही देण्यात आली. मात्र, भाजपमध्ये फारसे भवितव्य नसल्याचं लक्षात येताच त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times