राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. चाकणकर या पुण्यातील लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट टपाल कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना चाकणकर यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली.
वाचा:
‘फक्त शहरांची नावे बदलण्यातच हे मुख्यमंत्री मश्गुल असून त्यांना महिलांच्या सुरक्षेचे काहीही घेणेदेणे नाही. लहान मुली, युवती, अंगणवाडीच्या ५० वर्षीय महिलादेखील या राज्यात सुरक्षित नाहीत. त्यामुळे देशाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. नामुष्की सहन करावी लागत आहे,’ असं चाकणकर म्हणाल्या. योगींना पाठवण्यात आलेल्या पत्रातही या सगळ्याकडं लक्ष वेधण्यात आल्याचं चाकणकर यांनी सांगितलं.
‘समस्त देशाचे श्रद्धास्थान असलेल्या रामजन्मभूमीमध्ये आज सर्वात जास्त गुन्हे होतात. महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होतात हे अत्यंत खेदजनक आहे. याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री अजयसिंह बिष्ट (योगी आदित्यनाथ) आहेत. गुन्हेगारांचे आणि गुन्ह्यांचे नंदनवन असलेल्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ‘योगी’ हे संबोधन वापरण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही, अशी टीका चाकणकर यांनी केली.
वाचा:
‘पीडित महिला संध्याकाळच्या वेळी एकटी गेली नसती तर ही घटना घडली नसती’ असं वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रीय आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांचाही चाकणकर यांनी समाचार घेतला. ‘एक महिला असं वक्तव्य करते हे भयंकर धक्कादायक आहे. हे सगळं पाहिल्यावर या देशाला गृहमंत्री आहेत की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे प्रचारमंत्री आहेत हे कळायला मार्ग नाही. शहा हे सदासर्वकाळ कोणत्या ना कोणत्या राज्याच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असतात. पदाला योग्य न्याय देता येत नसेल तर गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ प्रचारमंत्री म्हणून काम करावं, असा टोलाही त्यांनी हाणला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times