मुंबईः भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं राज्यात हळहळ व्यक्त करण्यात आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेची तातडीने दखल घेत चौकशीची आदेश दिले आहेत. त्यानंतर ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यानं महत्त्वाची माहिती दिली आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या वेळेस नवजात बालकांच्या दक्षता विभागाला शॉर्ट सर्किटमुळं आग लागली. यात १० बालकांचा मृत्यू झाला तर सात जणांचे प्राण वाचवणे शक्य झाले. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राष्ट्रपती कोविंद यांनीही संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यानंतर ठाकरे सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री यांनी भविष्यात अशा घटना घडू नये या दृष्टीने राज्य सरकार कडक नियम बनवण्याकडे लक्ष देईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

जिल्हा रुग्णालयात आगीत होरपळून नवजात बालकांचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे. भविष्यात अशा घटना घडू नये या दृष्टीने सरकार कठोर नियम बनवण्याकडे लक्ष देईल, असं त्यांनी नमूद केलं आहे. तसंच, रुग्णालयाग लागलेल्या आगीची काय कारणे आहेत? हे तपासण्याची गरज असून जो कोणी या प्रकरणात दोषी असेल, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यातील रुग्णालये, नर्सिंग होम या सर्व ठिकाणी फायर ऑडिट करण्याची गरज आहे. जर फायर ऑडिटमध्ये काही त्रुटी असतील, तर रुग्णालयामध्ये दुरुस्ती केल्याशिवाय सेवा देण्याची परवानगी देऊ नये, असंही त्यांनी म्हटलं आहे. शिवाय, रुग्णालयाला अयोग्य पद्धतीने खासगी, शासकीय किंवा नर्सिंग होम चालवण्यासाठी परवानगी दिली असेल तर तात्काळ त्यांचे परवाने रद्द केले पाहिजेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here