मुंबई: महानगरपालिका क्षेत्राचा होणारा विस्तार व वाढणारी लोकसंख्या पाहता मुंबई महापालिकेसाठी दोन आयुक्त असणे गरजेचे आहे. शहर आणि उपनगरासाठी दोन जिल्हाधिकारी आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईसाठी दोन आयुक्त असावेत. तशी मागणी आपण राज्याच्या नगरविकास विभागाकडे केली आहे, अशी माहिती माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री यांनी शनिवारी दिली.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून देशातील विविध भागांतून लोक रोजीरोटीच्या शोधात मुंबई शहरात येत असतात. याचा परिणाम म्हणून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र सध्या पालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरिकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहतात. शिवाय मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पालिका मुख्यालयात यावे लागते. नागरिकांची होणारी ही गैरसोय पाहता मुंबई शहर व उपनगरासाठी दोन महापालिका आयुक्त असणं गरजेचं आहे, असं अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

वाचा:

मालाड पी-उत्तर वॉर्डच्या विभाजनास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. लोकसंख्या वाढत असल्याने वॉर्डाची विभागणी करावी लागली आहे. ही बाब लक्षात घेता पालिकेसाठी दोन आयुक्तांची आवश्यकता आहे. आयुक्तांची दोन पदे निर्माण करण्यात आल्यास मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय व्यवहार करणं सोयीचं ठरणार आहे, असं अस्लम शेख यांनी सांगितलं.

अतिरिक्त आयुक्त उपनगरात कधी जाणार?

पूर्व आणि पश्चिम उपनगरासाठी पालिकेचे दोन अतिरिक्त आयुक्त आहेत. या दोघांसाठी उपनगरात कार्यालये बांधावीत. या अतिरिक्त आयुक्तांनी तेथून प्रशासकीय कामकाज करावे, असा ठराव पालिका सभागृहात अनेक वर्षांपूर्वी झाला आहे. मात्र प्रशासनाकडून कोणतीही हालचाल केली जात नाही. परिणामी उपनगरातील नागरिक व नगरसेवकांना आपल्या कामांसाठी महापालिका मुख्यालयात हेलपाटे घालावे लागतात, या मुद्दावरही या निमित्तानं चर्चा सुरू झाली आहे.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here