मुंबईः राज्यात आज पुन्हा एकदा रुग्ण बरे होणाऱ्या संख्येच्या तुलनेत करोना बाधित रुग्णांची आकडेवारी वाढली आहे. दिवसभरात २ हजार ४०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १८, ६१, ४०० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर, राज्यातील रिकव्हरी रेटमध्येही घट झाली आहे. ()

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील नवीन करोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत होती. मात्र, काही दिवसांपासून पुन्हा एकदा नवीन रुग्ण संख्येनं उसळी घेतली आहे. चिंतेची बाब म्हणजे शुक्रवारी राज्याचा रिकव्हरी रेट ९४. ७५ टक्के इतका होता. आज मात्र राज्याचा रिकव्हरी रेट ९४. ०७ टक्के झाला आहे. म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले आहे. गेल्या २४ तासांत ३ हजार ५८१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १९ लाख ६५ हजार ५५६ इतके झाले आहे.

महाराष्ट्रातील करोना मृत्यूचा आकडा ५० हजारांच्या पार झाला आहे. गेल्या २४ तासांत ५७ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २. ५५ टक्के इतका आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५२ हजार ९६० इतकी झाली आहे. आज पर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३३ लाख ३८ हजार ४८८ चाचण्यांपैकी १९ लाख ६५ हजार ५५६ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सध्या राज्यात २ लाख ३४ हजार ५४५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ४७४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here