जकार्ता: इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण करणारे श्रीविजया एअरचे विमान समुद्रात कोसळ्याचे (Indonasian lane crashes) वृत्त आहे. इंडोनेशियाचे परिवहन मंत्री बुदी कारया यांनी या वृत्ताल दुजोरा दिला आहे. एसजे १८२ हे विमान जकार्ता विमानतळापासून २० किलोमीटरच्या अंतरावर अपघातग्रस्त झाल्याचे कारया यांनी माहिती देताना सांगितले. या विमानात १२ क्रू मेंबर्सव्यतिरिक्त ५० प्रवासी होते. हे विमान इंडोनेशियाच्या लाकी द्वीपाजवळ कोसळले. ( with 62 passengers on board crashes)

इंडोनेशियाच्या सोशल मीडियावर या विमानाच्या छिन्नविछिन्न झालेल्या भागांचे फोटो व्हायरल होत होते. मात्र, तोपर्यंत हे विमान कोसळल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नव्हते. या पूर्वी देखील सन २०१८ मध्ये इंडोनेशियाच्या लायन एअरचे विमान समुद्रात कोसळले होते. या दुर्घटनेत १८९ लोकांचा मृत्यू झाला होता.

२६ वर्षे जुने आहे हे विमान
विमानाच्या रजिस्ट्रेशनच्या नंबरनुसार, हे विमान २६ वर्षे जुने बोइंग ७३७-५०० साखळीतील आहे. या विमानाने जकार्ताच्या सोकार्नो-हट्टा विमानतळावरून उड्डाण केले होते. उड्डाणानंतर ४ मिनिटांनंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलचा विमानाशी असलेला संपर्क तुटला होता. यानंतर लगेचच शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले होते.

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येबाबत सरकारचे मौन
या दुर्घटनेत किती लोक ठार झाले याबाबत सरकारने मौन धारण केले आहे. मदत आणि बचावाचे काम सुरू करण्यात आले असून आतापर्यंत कोणीही जिंवत प्रवासी सापडलेला नाही. प्रवाशांच्या मृतदेहाचा तपास लागल्यानंतरच सरकार मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येबाबत काही बोलू शकेल, असे एका अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

एका मिनिटात १० हजार फूट खाली आले विमान

फ्लाइट रडार २४ने (FlightRadar24) हे विमान एका मिनिटात १० हजार फूट खाली आल्याचे ट्रॅक केले होते. यानंतर हे विमान अपघातग्रस्त झाले असावे अशी शंका बळावली. इतक्या तीव्र गतीने जेव्हा विमान खाली येते तेव्हा ते कोसळल्याचीच शक्यता अधिक असते.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here