मुंबई- पंजाबच्या भटिंडा येथे सिनेअभिनेत्री विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृद्ध शेतकरी महिला यांनी कंगना विरूद्ध भठिंडा न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी ११ जानेवारी रोजी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे दिड महिन्यांपूर्वी भाकियू उगराहांच्या बॅनरखाली वृद्ध महिला शेतकरी महिंदरपाल कौर या युनियनचा झेंडा हातात घेऊन इतर शेतकऱ्यांसोबत चालत होत्या. त्यांचा हा फोटो कंगनाने ट्वीट करत आक्षेपार्ह टीका केली होती. अशा महिला १०० रुपयांसाठी कोणत्याही आंदोलनात सामील होतात असं कंगनाने ट्वीट केलं.

कंगनाच्या या ट्वीटवर शेतक्यांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला होता. हा वाद वाढत असल्याचं पाहिल्यानंतर कंगनाने आपलं ट्वीट डिलीट केलं. संपूर्ण प्रकरणावर प्रसारमाध्यमांसमोर महिंदर यांनी आपली प्रतिक्रियाही दिली होती. यासोबतच हवं असेल तर कंगनाला मी माझ्या शेतात शेतकरी म्हणून ठेवते आणि तिला याचा मोबदलाही देते अशी प्रतिक्रिया दिली होती. कंगनासारख्या सात महिलांना त्यांनी शेतात कामावर ठेवलं आहे. जर कंगनाला हवं असेल तर त्या दिवसाला ७०० रुपये प्रमाणे तिला मानधन देतील.

यानंतर महिंदर कौर यांचा भारतीय किसान संघ एकता उगराहांने टीकरी सीमेवर गौरवले. या महिलेचे वकील राघवीर बहनीवाल यांनी अभिनेत्री कंगना विरोधात स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल केली. सुनावणीची पुढील तारीख ११ जानेवारी निश्चित करण्यात आली आहे. वकील राघवीर म्हणाले की कलम ५०० आणि ४९९ अंतर्गत न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here