गोएअरने तत्काळ कारवाई करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अपमानजनक टिप्पणी करणारे वरिष्ठ वैमानिक मिक्की मलिक यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने दिली. गुरुवारी पंतप्रधानांवर टिप्पणी करणाऱ्या कॅप्टन मलिक यांनी आक्षेपार्ह ट्विट हटवत आपले अकाउंट लॉक केले.
क्लिक करा आणि वाचा-
असे प्रकार जराही खपवून न घेण्याचे गोएअरचे धोरण असल्याचे प्रवक्याने सांगितले. कर्मचाऱ्यांसाठी कंपनीचे सर्व नियम, सूचना आणि नीतींचे पालन करणे अनिवार्य आहे. यात सोशल मीडिया व्यवहाराचा देखील समावेश आहे, असे गोएअरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. कोणत्याही व्यक्तीने किंवा कर्मचाऱ्याने व्यक्त केलेल्या व्यक्तिगत विचारांशी एअरलाइन्सचा संबंध नसल्याचेही प्रवक्ता म्हणाला.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times