करोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी हा स्वयंसेवक सर्व निकष पूर्ण करत होता, अशी माहिती भारत बायोटेकच्या अधिकाऱ्याने दिली. चाचणीपूर्वी हा स्वयंसेवक पूर्णपणे तंदुरुस्त होता. या स्वयंसेवकाला डोस दिल्यानंतर तो पूर्णपणे देखरेखीखालीच होता. डोस दिल्यानंतर सात दिवसांनंतर त्याच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर त्याच्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम जाणवला नाही, असे अधिकारी म्हणाला.
९ दिवसांनंतर
१२ डिसेंबरला करोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीदरम्यान लस घेणाऱ्या एका स्वयंसेवकाचा ९ दिवसांनंतर मृत्यू झाला. शुक्रवारी या स्वयंसेवकाच्या मुलाने ही माहिती दिली. या नंतर चाचणी घेणाऱ्या रुग्णालयात खळबळ उडाली. या स्वयंसेवकाच्या शवविच्छेदनाच्या अहवालात शरीरात विष सापडल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र स्वयंसेवकाच्या मृत्यूचा लसीकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे चाचणी केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मात्र, या स्वयंसेवकाला लस दिली गेली होती की प्लेसिबो दिला गेला होता याबाबत स्पष्टता नाही. औषधाचा मानसिक परिणाम काय होतो, हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर्स प्लेसिबोचा वापर करत असतात. प्लोसिबो हे औषध नसते आणि त्याचा साइडइफेक्टही होत नाही. करोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीदरम्यान केवळ ५० टक्के लोकांना लशीचा डोस देण्यात आला आहे. उर्वरित लोकांना प्लेसिबो देण्यात आला आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times