म. टा. प्रतिनिधी,

येत्या आठवड्यात सर्वांसाठी सुरू होण्याबाबत निर्णय अपेक्षित असल्याचे राज्य सरकारने न्यायालयात सांगितले आहे. यामुळे रेल्वे आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय रेल्वे प्रवासी महासंघाने घेतला आहे. सर्वांसाठी लोकल सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असे ही महासंघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

‘लोकल सुरू करण्यासाठी सरकार सकारात्मक’, ‘सर्वांसाठी लोकल लवकरच’, ‘नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात ‘, असे सरकारमधील मंत्र्यांनी अनेकदा सांगितले. आज, १० तारीख उगवली. अद्याप सर्वांसाठी लोकल सुरू झालेली नाही. ‘लांडगा आला रे आला’, अशी गत ५० लाखांहून अधिक सामान्य मुंबईकरांची झाली. आता केवळ न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.

राज्य सरकार सामान्यांना जुमानत नाही मात्र न्यायव्यवस्थेचा नक्कीच आदर ठेवतील. यामुळे सर्व संघटनांनी एकमताने सध्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मंगळवारपर्यंत सर्वांसाठी लोकल खुली न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य प्रशासनाची असेल, असाही इशारा देण्यात आलेला आहे.

‘आणखी प्रतीक्षा नको’

करोना लसीकरणाची महत्त्वाची जबाबदारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांवर आहे. मात्र त्यांना पूरक असलेल्या मनुष्यबळाला लोकलमुभा नाही. जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा विचार करून सामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी. आणखी प्रतीक्षा नको, अशी मागणी ही प्रवासी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here