इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये शनिवारी रात्री उशिरा अचानकपणे वीज गेल्याने गोंधळ उडाला. कराची, इस्लामाबाद, मु्ल्तान आणि रावळपिंडीसह अनेक शहरे अंधारात बुडाली. अचानकपणे झालेल्या ब्लॅकआउटमुळे पाकिस्तानमध्ये अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे अनेकांची झोप उडाली. मात्र, पॉवर ट्रिपींगमुळे ही समस्या उद्भवली असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

इस्लामाबादचे उपायुक्त हमजा शफकत यांनी ट्विट करून सांगितले की, नॅशनल ट्रान्समिशन अॅण्ड डिस्पॅच सिस्टम (NTDC) मध्ये ट्रिपिंग झाल्यामुळे ब्लॅकआउट झाला आहे. वीज वितरण प्रणालीत अचानकपणे झालेल्या बिघाडाचे कारण शोधण्यासाठी NTDC कडून काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती ऊर्जा विभागाच्या प्रवक्त्यांनी दिली असल्याचे वृत्त एक्स्प्रेस ट्रिब्युनने दिले आहे.

वाचा:

पॉवर ट्रान्समिशन यंत्रणेची फ्रीक्वेन्सी अचानकपणे ५० हून शू्न्यावर आल्यामुळे देशव्यापी ब्लॅकआउट झाला असल्याची माहिती ऊर्जा मंत्रालयाने दिली. हा तांत्रिक बिघाड रात्री ११.४१ वाजण्याच्या सुमारास झाला. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असून टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे.

याआधीदेखील २०१५ मध्ये अशीच घटना घडली होती. तांत्रिक बिघाडामुळे अनेक तास वीज पुरवठा खंडित झाला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here