नवी दिल्लीः रोल्स रॉयस मोटर्सने भारतात आपली पहिली ऑफ परे रोड लाँच केली आहे. या कारची किंमत तब्बल ८.२ कोटी रुपये (एक्स शो रूम) इतकी आहे. या कारला ऑल व्हिल ड्राइव्ह सह लाँच केले आहे. कलिनन ब्लॅक बॅज असं या कारचं नाव आहे.

रोल्स रॉयल्स मोटर्सने कलिनन ब्लॅक बॅजला रेथ आणि घोस्ट मॉडलसह २०१६ मध्ये लाँच केले होते. परंतु, वर्षभरानंतर म्हणजे २०१७ मध्ये या कारचे उत्पादन बंद करण्यात आले होते. यात देण्यात आलेले ब्लॅक बेज युथ जनरेशनला आकर्षित करण्यासाठी हे तयार केले आहे. या कारचे इंजिन आमि केबिन पहिल्यासारखेच ठेवलेले आहेत. कारची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ४४ हजारांहून अधिक रंग निवडण्याची संधी आहे. ग्राहकांच्या आवडीनुसार ते कारचा रंग निवडू शकतात. या कारचे इंजिन ब्लॅक बेजमध्ये ६.७५ लीटर ट्विट टर्बो चे १२ इंजिन मिळते. ते ५९० बीएचपीचे पॉवर आणि ९०० एनएमचे टॉर्क देते. या इंजिनासोबत ८ स्पीड एचएफ आणि ७ स्पीड झेडएफ ट्रान्समिशन चा पर्याय दिला जातो. या इंजिनमध्ये सध्याच्या इंजिनापेक्षा २९ बीएचपी आणि टॉर्क ला ५० एनएम पर्यंत वाढवले आहे. पर्याय देणारी ही पहिली कार आहे.

या कारमध्ये २२ इंचाचा ब्लॅक अलॉय व्हिल दिला आहे. यात खास एडिशन आहे. जबरदस्त केबिन आणि हायटेक फीचर्स देण्यात आले आहेत. यात इंटिरियरला ब्लॅक रेड रंगात तयार करण्यात आले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here