मुंबईः २०२२ला होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेनं आत्तापासून तयारी सुरु केली आहे. गुजराती बांधवांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेनं आज आयोजित केला आहे.

२०२०मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेत आत्तापासूनच चढाओढ लागल्याचे दिसतेय. भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर भाजपनं मुंबई महानगरपालिकेत एकहाती सत्ता स्थापन करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी आमदार अतुल भातखळकर यांची प्रभारी म्हणून नियुक्तीदेखील जाहीर केली आहे. तसंच, भाजपा सर्वच्या सर्व २२७ जागा स्वबळावर लढणार आहे. एकीकडे शिवसेनेनंही भाजपला मात देण्यासाठी मोहिम आखली आहे. मुंबई मा जलेबी ने फाफडा; उद्धव ठाकरे आपडा, अशी टॅगलाइन देत शिवसेनेनं गुजराती मेळावा आयोजित केला आहे.

गुजराती सामाजासाठी मेळाव्याचं आयोजन शिवसेनेकडून करण्यात आलं आहे. अंधेरी-ओशिवरा इथल्या गुजरात भवनातील नवनीत हॉलमध्ये हा मेळावा होणार आहे. या मेळ्याव्यासाठी १०० गुजराती व्यापारी उपस्थित राहणार आहेत. तर, ११ गुजराती उद्योगपती शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक नेहमीच प्रतिष्ठेची राहिली आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर एकटी लढणार, की आणखी कोणाला सोबत घेऊन लढणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मुंबई महानगरपालिकेची सत्ता राखण्यासाठी शिवसेनेनंही आत्तापासून कंबर कसली आहे. गुजराती मेळावा हासुद्धा त्याच्याच एक भाग असल्याची चर्चा आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here