माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे आमदार प्रसाद लाड, आशिष शेलार, रावसाहेब दानवे यांच्याही सुरक्षेत राज्य सरकारने कपात केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आता राजकारण रंगू लागले आहे. भाजप आमदार यांनी या निर्णय सूड भावनेनं घेतल्याचा आरोप केला आहे.
राम कदम यांनी एक ट्विट करत सरकारवर आरोप केला आहे. ‘महाराष्ट्र सरकार सुडाच्या भावनेतून भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला. जर सुरक्षा कपातीनंतर काही बरे वाईट झालं तर त्यांची सर्वस्वी जबाबदारी महाविकास आघाडीची असेल हे याद राखा,’ असा इशाराच त्यांनी दिला आहे. तसंच, ‘आणखी कोणा कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार?,’ असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिवीजा फडणवीस यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात येणार आहे. याआधी अमृता फडणवीस यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. तर नवीन आदेशानुसार आता त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्याचबरोबर, रिपाइंचे नेते रामदास आठवले, भाजप आमदार आशिष शेलार, दिपक केसरकर यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times