सिडनी, : सिडनीच्या मैदानात भारतीय खेळाडूंवर चाहत्यांनी शिवीगाळ आणि वर्णद्वेषी टीका केल्याचे आता समोर आले आहे. याबाबत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. पण या सर्व प्रकारानंतर विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पहिल्या कसोटी सामन्यातही प्रेक्षकांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीला डिवचले होते. कोहली त्यावेळी शांत राहिला होता. पण त्यानंतर जेव्हा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला बाद केले, तेव्हा कोहलीने या चाहत्यांना तोडीस तोड उत्तर दिले. विकेट मिळाल्यावर कोहली चाहत्यांच्या दिशेने काही तरी बोलला, त्याचबरोबर कोहलीने यानंतर आपली छाती फुगवुन दाखवली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर नाराज झालेले पाहायला मिळाले होते.

भारताचे जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी काही प्रेक्षकांनी शिविगाळ केली होती. या दोघांच्या विरुद्ध वर्णभेदी वक्तव्य करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय संग व्यवस्थापनाने या दोन खेळाडूंसह सामनाअधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. रविवारी सामना सुरू झाल्यानंतर स्टेडियममध्ये पोलिस आले आणि त्यांनी सहा प्रेक्षकांना मैदानाबाहेर घालवले. रविवारी जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या डावातील ८६व्या ओव्हरनंतर जेव्हा मोहम्मद सिराज (mohammad siraj) त्याची २५वी ओव्हर टाकून सीमेरेषेवक फिल्डिंग करत होता. तेव्हा तो कर्णधार अजिंक्य रहाणेच्या जवळ आला. ते दोघे मैदानातील अंपायरकडे गेले आणि प्रेक्षकांकडून पुन्हा चुकीची वक्तव्य केली जात असल्याची तक्रार केली.

या सर्व प्रकरणाबाबत ऑस्ट्रलियाच्या क्रिकेट मंडळाने भारतीय संघाची माफी मागितली आहे. ऑस्ट्रलियाच्या क्रिकेट मंडळाने याबाबत एक पत्रक काढले आहे. या पत्रकामधअये त्यांनी म्हटले आहे की, ” भारतीय संघातील खेळाडूंबाबत जी वागणूक पाहायला मिळाली, ती खपवून घेणार नाही. दोषींवर कडक कारवाई आम्ही करणार आहोत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद या प्रकरणाचा तपास करत आहे. त्याचबरोबर मैदानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले जात आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. दोषींवर आजीवन बंदी घालण्याचा विचारही आम्ही करत आहोत.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here