‘मी कधीही सुरक्षा घेतली नव्हती. मुख्यमंत्री झाल्यानंतर मला सुरक्षा मिळाली होती. याकूब मेमन आणि नक्षलवादी कारवायांनंतर केंद्र सरकारनं काही निर्देश दिले होते. याआधारावर माझी सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता राज्य सरकारला धोका कमी झालाय असं वाटतं असेल म्हणून त्यांनी सुरक्षा कमी केली असावी, ‘असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
‘तुम्हाला सुरक्षा द्यायची की नाही द्यायची याची एक पद्धती असते. आमच्या सरकारच्या काळात आम्ही तिच पद्धती अवलंबवत होतो. परंतु, या सरकारच्या काळात ज्यांना कोणताही धोका नाही त्यांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा दिली जातेय, असं पाहायला मिळतंय. पण माझी यावर कोणतीही तक्रार नाही. सुरक्षा कमी केली म्हणून मी फिरणं थांबवणार नाही. त्यामुळं या निर्णयाचा माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही,’ असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेतही कपात
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिवीजा फडणवीस यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात येणार आहे. याआधी अमृता फडणवीस यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. तर नवीन आदेशानुसार आता त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times