म. टा. वृत्तसेवा, : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील विंचूर येथून जवळच असलेल्या भरवस फाटा येथे रात्री दोनच्या सुमारास पडला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात कारभारी आबाजी जगताप (वय ६९) यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी अलका कारभारी जगताप या गंभीर जखमी झाल्या आहेत.

मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास ही घटना घडली. येवला रस्त्यालगतच जगताप यांचे घर आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे दाम्पत्य घरात होते. त्यांची दोन्ही मुले शेतात राहतात. मुले त्यांच्या घरी सकाळी गेले. त्यांनी दोघांना झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. जगताप यांचा मृत्यू झाला होता. तर अलका या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या जबाबानंतर नेमके काय घडले याचा उलगडा होणार आहे. हा दरोडा आहे की खून? या दिशेने पोलीस तपास करत आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर डीवायएसपी सोमनाथ तांबे, पोलीस निरीक्षक रंगनाथ सानप, पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here