या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधील चौक्यांना निशाणा बनवून गोळीबार सुरू करण्यात आला. या दरम्यान पाकिस्तान एकीकडे गोळीबार करत असताना त्याआडून दुसरीकडे दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचे काम करत असल्याचे भारतीय सैन्यदलाच्या जवानांनी पाहिले. यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानला उत्तर देण्यास सुरुवात केली. या वेळी भारतात घुसू पाहणारे दहशतवादी पळून गेले. मात्र पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच राहिला.
भारताकडून प्रयुत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या तीन चौक्यांना नुकसान झाले. यात पाकचे तीन सैनिकही मारले गेले. नुकसान झाल्यानंतर पाकिस्तानकडून गोळीबार बंद करण्यात आला. या परिसरात भारतीय सैन्यदलाने शोध मोहीम देखील हाती घेतली. या वेली कलाल आणि झंगड परिसरातील चौक्यांवर देखील निशाणा साधण्यात आला.
पाकिस्तानने बालाकोट आणि कठुआवर देखील साधला निशाणा
या व्यतिरिक्त पाकिस्तानकडून पुंछ जिल्ह्यातील बालाकोट सेक्टरमध्ये देखील चौक्यांवर निशाणा साधत गोळीबार करण्यात आला. भारताने याचे सडेतोड उत्तर दिले. अशा प्रकारे शनिवारी रात्री उशिरा पाककडून कठुआच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर हीरानगरमधील चौक्यांवर निशाणा साधत गोळीबार करण्यात आला. या कारवाईला देखील सडेतोड उत्तर देण्यात आले.
पाकिस्तानच्या या कारवाया लक्षात घेता आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार केल्यानंतर भारताने या कारवाईचे जशास तसे उत्तर दिल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times