दिब्रुगडः एकीकडे संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना, दुसरीकडे आसाममधील तीन जिल्ह्यांमध्ये पाच स्फोट झाल्याचे वृत्त आहे. दिब्रुगड, आणि तिनसुकिया या तीन जिल्ह्यात एकूण पाच ग्रेनेड हल्ले झाल्याची माहिती मिळाली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने संपूर्ण देशात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यात तीन स्फोट घडवण्यात आले. तर, चराइदेव आणि तिनसुकिया जिल्ह्यात प्रत्येकी एक झाला. या स्फोटांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसून, याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

कुठे झाले स्फोट?

पहिला स्फोट दिब्रुगड जिल्ह्यातील ग्राहम बाजारात झाला. दुसरा स्फोट शीख नॅशनल स्कूलजवळ झाला. या स्फोटामुळे शाळेच्या भिंत पडल्याचे वृत्त आहे. तर, तिसरा स्फोट दुलियाजान येथे पादचारी मार्गावर झाला. या तीन स्फोटांमुळे दिब्रुगड जिल्हा हादरून गेल्याचे समजते. आसाममधील चौथा स्फोच तिनसुकिया जिल्ह्यातील डूमडोमा येथील एका पुलाजवळ झाला. तर, पाचवा स्फोट चराइदेव जिल्ह्यातील सोनारी येथील टेकोक घाटाजवळ झाल्याची माहिती मिळाली आहे.

आसामचे मुख्यमंत्री यांनी या घटनेची निंदा केली असून, या घटनेचा सखोल तपास करून, आरोपींना शक्य तितक्या लवकर पकडण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान, गेल्या आठवड्यातील सोमवारी प्रजासत्ताक दिनाची पूर्वतयारी सुरू असताना चराइदेव जिल्ह्यात एक स्फोट घडवण्यात आला होता. या स्फोटामुळे अनेक दुकानांचे नुकसान झाले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here