खरे तर, बैतूलच्या क्षेत्राला लागून एक जंगलाचा भाग आहे. तो भाग जेव्हा गुगलवर सर्च करण्यात आला तेव्हा तो भाग चक्क पाकिस्तानातील राष्ट्रीय उद्यान असल्याचे दाखवण्यात येते. गुगलची ही चूक आमच्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोकादायक सिद्ध होऊ शकते, असे या युवकांचे म्हणणे आहे. पाकिस्तानचे भारताशी संबंध चांगले नाहीत. अशात शत्रू राष्ट्र असलेला पाकिस्तान याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करू शकतो, असे युवकांना वाटते.
गुगलच्या या चुकीमुळे देशातील जनतेच्या भावनाही दुखावल्या जात आहेत, असे म्हणत या युवकांनी गुगलच्या विरोधात एफआयआर दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यासाठी युवकांनी बैतूलच्या सहाय्यक पोलिस अधीक्षकांची देखील भेट घेतली.
क्लिक करा आणि वाचा बातमी-
देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित या प्रकरणात स्थानिक पोलिसांची भूमिका देखील निराशाजनक असल्याचे युवकांचे म्हणणे आहे. हे प्रकरण जंगलाशी संबंधित असल्याने यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times