खरेतर ब्रिटनचे पंतप्रधान हे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार होते. मात्र ब्रिटनमध्ये नव्या स्ट्रेनचा उद्रेक झाल्याचे पाहून त्यांनी आपला भारत दौरा रद्द केला होता. यानंतर भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या संचलन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्याचा शोध सुरू केला.
क्लिक करा आणि वाचा-
सूरीनामच्या राष्ट्रपती भोजपुरीत बोलले
गेल्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ व्या अनिवासी भारतीय दिवस संमेलनाला डिजिटल माध्यमाद्वारे संबोधित केले. या कार्यक्रमात सूरीनामचे राष्ट्रपती चंद्रिकाप्रसाद संतोखी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्य संबोधन त्यांचेच होते. विशेष म्हणजे त्यांनी आपले संबोधन भोजपुरीत केले. ते म्हणाले, ‘भारत के प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी जी, मेरे प्यारे प्यारे भारतीय प्रवासी भईया और बहना लोगन, हमार ओर से आप लोगों को राम जोहार पहुंचे। का हाल बा? हमार देश सूरीनाम आप सब लोगों को अभिनंदन प्रस्तुत करिला’
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times