मुंबई: आयएनएसवर बेतवावर तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या जवानाचा मृतदेह आढळल्याने () खळबळ उडाली आहे. रमेश चौधरी असे या २२ वर्षीय जवानाचे नाव आहे. चौधरी याच्या डोक्याला गोळी लागली असून त्याच्या मृतदेहा शेजारीच त्याची रायफलही आढळली आहे. प्रथमदर्शनी ही असल्याचे सांगितले जात आहे. मुळचा जोधपूरचा असलेला चौधरी मुंबईत आएनएस बेतवावर तैनात होता. आज (रविवारी) सकाळी त्याने आपल्या सर्व्हिस रायफलद्वारे स्वत:वर गोळी झाडून घेतली. चौधरीचा बेतवावर मृतदेह सापडला. त्यावेळी त्याच्या मृतदेहाशेजारी त्याची सर्व्हिस रायफ ल देखील होती. मुंबई पोलिस नौसेनेच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत. (a was found dead due to a )

रमेश चौधरी याच्या कुटुंबात आई-वडील आणि बहीण आहे. रमेश अविवाहीत आहे. नुकतीच सु्ट्टी संपवून तो परत आला होता. चौधरी याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आएनए बेतवा ही नौका मिसाईल फ्रिगेट श्रेणीची नौका आहे. बेतवा नदीच्या नावावरून या नौकेला हे नाव देण्यात आले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

भारतीय सैन्यदलात आत्महत्या करण्याची ही घटना काही नवी नाही. या पू्र्वी सैन्यदलात आत्महत्यांची प्रकरणे उघड झालेली आहेत. भारतीय नौदलात तुलनेने कमी आत्महत्या झाल्या आहेत. आयएनएसवर शिवालीकवर एका २४ वर्षीय जवानाने देखील स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या होत्या.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here