माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांसारख्या बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही गृहमंत्र्यांना फोन करुन गरज नसल्यास माझी सुरक्षा कमी करण्यात यावी, असं म्हटलं आहे. यांनीच याबाबत माहिती दिली आहे.
‘शरद पवार केंद्रात इतके वर्ष मंत्री होते. राज्यात ते अनेकवेळा मुख्यमंत्री झाले. इतके वरिष्ठ नेते असताना त्यांना भाजप सत्तेत असताना एकसुद्धा पायलट आणि एस्कोर्ट नव्हता,’ अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.
‘एका समितीच्या अहवालानुसार अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही एक वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती बनवली होती. सुरक्षा कोणाला किती द्यायची हे त्यांना असलेल्या धोक्यावरुन ठरवलं जातं,’ असं स्पष्टीकरण ही त्यांनी दिलं आहे.
या नेत्यांची सुरक्षा कमी
विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांसह काही नेत्यांच्या सुरक्षेत आज कपात करण्यात आली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times