राज्यात आज आढळून आलेल्या नव्या ३,५५८ रुग्णांची संख्या पकडता आता राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १९,६९,११४ वर पोहोचली आहे. तर आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्यात आतापर्यंत एकूण १८,६३,७०२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ५०,०६१ वर पोहोचली आहे. या बरोबरच सध्या राज्यात ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशा सक्रिय रुग्णांची (Active Cases) संख्या ५४,१७९ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा ही बातमी- पुण्यात आज वाढले २६४ नवे रुग्ण
या बरोबरच, पुणे शहरात आज दिवसभरात एकूण २६४ रुग्ण आढळले असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या १ लाख ८१ हजार ५११ इतकी झाली आहे. तसेच आज ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ४ हजार ६७९ वर पोहोचली आहे. या बरोबरच एकूण २१४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. तसेच, करोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख ७४ हजार १४३ इतकी झाली आहे. करोनामुक्त झाले आहेत.
क्लिक करा आणि वाचा ही बातमी- क्लिक करा आणि वाचा ही बातमी-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times