या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश दळवी यांचा मुलगा प्रेम दळवी हा १३ वर्षांचा मुलगा सोसायटीतील मित्रांसोबत शनिवारी संध्याकाळी सोसायटीच्या आवारातच क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळत असताना सुमारे साडे पाचच्या सुमारास मुलांमध्ये वाद झाला. या किरकोळ वादातून खेळणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाने प्रेमच्या . ही बॅट प्रेमच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरात लागल्याने गंभीर दुखापत झाली. प्रेम जागीच खाली कोसळला. या घटनेनंतर तातडीने प्रेमला पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अन्वये बॅट मारणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
नागरिकांनी रुग्णालयाबाहेर केली मोठी गर्दी
ही घटनेचे वृत्त कळताच परिसरातील लोकांनी उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. थोड्याच वेळात रुग्णालयाबाहेर हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले. मुलांमधील खेळण्या-खेळण्यात झालेले वादही इतके टोकाला जाऊ शकतात याची चर्चा परिसरात ऐकायला मिळत आहे.
क्लिक करा आणि वाचा ही बातमी- क्लिक करा आणि वाचा ही बातमी-
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times