या ऐतिहासिक उड्डाणाचा टेक ऑफ देखील समारोहासारखा साजरा करण्यात आला. नागरी उड्डयन मंत्री हरदीप पुरी यांनी देखील या समारोहाचे छायाचित्र शेयर केले आहे. सॅन फ्रान्सिस्को येथून विमानाने उड्डाण केल्यानंतर पुरी यांनी ट्विट केले. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘कॉकपिटमध्ये प्रोफेशनल, योग्य आणि आत्मविश्वास असलेल्या महिला चालक सदस्यांनी एअर इंडियाच्या विमानाने सॅन फ्रान्सिस्को येथून बेंगळुरूसाठी उड्डाण केले आहे आणि ते उत्तर ध्रुवावरून प्रवास करतील. आमच्या नारीशक्तीने ही प्रथम कामगिरी कर त इतिहास रचला आहे.’
एअर इंडिया देखील वेळोवेली या उड्डाणाबाबत ट्विट करत माहिती देत आहे.
विमान उत्तर ध्रुवावरून पुढे गेले आहे. हे उड्डाण उत्तर ध्रुवावरून अटलांटिक मार्गे बेंगळुरूला पोहोचणार आहे.
उड्डाण क्रमांक एआय-१७६ शनिवारी सॅन फ्रान्सिस्कोहून रात्री ८.३० वाजता (स्थानिक वेळेनुसार) रवाना झाले आणि भारतीय प्रमाणवेळेनुसार हे विमान सोमवारी पहाटे ३.४५ वाजता बेंगळुरूला पोहोचेल. सॅन फ्रान्सिस्कोहून बेंगळुरूला निघालेले हे नॉन-स्टॉप विमान सुमारे १७ तास प्रवास करणार आहे.
कॅप्टन जोया अग्रवाल या ऐतिहासिक उड्डाणाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासोबत सहवैमानिक असलेल्या कॅप्टन पापागरी तनमई, कॅप्टन आकांक्षा सोनवरे आणि कॅप्टन शिवानी मन्हास या आहेत.
क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times