परभणी: करोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळं काहीशी उसंत मिळालेल्या राज्य सरकारसाठी चिंतेची बातमी आहे. जिल्ह्यात ८०० कोंबड्यांचा ‘बर्ड फ्लू’मुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. अन्य ठिकाणी या रोगाची लागण होऊ नये म्हणून प्रशासनानं तातडीनं हालचाली सुरू केल्या असून जिथं आढळून आला आहे, त्या ठिकाणासह आसपासच्या एक किलोमीटरच्या परिसरातील कोंबड्या नष्ट करण्यात येणार असल्याचं समजतं. या परिसरात कुणी जाऊ नये, असे आदेश पशुसंवर्धन विभागानं दिले आहेत.

गावातील ८०० कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला होता. एवढ्या मोठ्या संख्येनं कोंबड्या दगावल्याने स्थानिक प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेतली व मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्यात या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच झाल्याचं निदान करण्यात आलं.

हा अहवाल येताच प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. खबरदारी म्हणून मुरुंबा गावच्या एक किलोमीटर परिसरातील हजारो कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. जेसीबीने खड्डा खोदून त्यात या कोंबड्या पुरण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुरुंबा गावात बर्ड फ्लूनं शिरकाव केल्यानं हे गाव संसर्गित म्हणून घोषित करण्यात आलं आहे. येथील कोंबड्यांचं सर्व्हेक्षण करण्यात येणार असून कोंबड्या, अंड्यांची वाहतूक व खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here