अहमदनगर: सुखी संसाराची स्वप्न पाहत बोहल्यावर चढू पाहणाऱ्या नवरदेवानं काही क्षण आधीच कायमची एक्झिट घेतल्याची मनाला चटका लावणारी घटना तालुक्यात घडली आहे. शेवटचे मंगलाष्टक सुरू असतानाच नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. लग्नाच्या वरातीतील ‘डीजे’ आणि त्यावर नाचताना झालेल्या धावपळीला यासाठी दोष दिला जात आहे. (Groom Dies of Heart Attack During Wedding Ceremony)

वाचा:

कर्जत तालुक्यातील चिलवडी या गावात रविवारी जगताप आणि राऊत यांच्यात लग्नसमारंभ होता. मुलगी चिलवडीची आणि नवरदेव भूम (जि. उस्मानाबाद) येथील. दुपारची वेळ होती. वरात आणि अन्य सोपस्कार पूर्ण होऊन लग्न विधीला सुरुवात झाली. ग्रामीण भागातील पद्धतीनुसार शेवटच्या मंगलाष्टकापूर्वी थांबून उपस्थित मान्यनरांची आशीर्वादपर भाषणे झाली. ती संपून पुन्हा मंगलाष्टक सुरू होताच नवरदेवाला चक्कर आली. तो एकदम कोसळलाच. त्याला उचलून तातडीने राशीन येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून रुग्णालयात येण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पुढील सोपस्कार आणि शवविच्छेदन करण्यात आले. नवरदेवाचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे आढळून आले.

वाचा:

या घटनेनंतर दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांची चांगलीच धावपळ उडाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बंधने असली तरी लग्नसमारंभ जोरात होत आहेत. या लग्नातही डीजे लावण्यात आला होता, त्याच्यापुढे नवरदेवाच्या मित्रमंडळींनी जोरदार नृत्य केले. काही काळ नवदेवही त्यांच्यात सहभागी झाल्याचे सांगण्यात येते.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here