वाचा:
जुहूमधील ए बी नायर मार्गावर ‘शक्तीसागर’ नावाची सहा मजली निवासी इमारत आहे. ही इमारत सोनू सूदच्या मालकीची आहे. मात्र, सोनूनं या इमारतीत बदल करून तिचं हॉटेलमध्ये रूपांतर केलं होतं. त्यासाठी महापालिकेची आवश्यक परवानगी घेतली नाही, असे तपासणीत आढळल्यानंतर पालिकेने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोनूला एमआरटीपी कायद्यांतर्गत नोटीस बजावली होती. त्याविरोधात सोनूने दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून कठोर कारवाई होऊ नये म्हणून तातडीचा अर्जही केला होता. दिवाणी न्यायालयाने तो अर्ज फेटाळत त्याविरोधात अपील करण्यासाठी त्याला तीन आठवड्यांची मुदत दिली होती. त्याचा अर्ज फेटाळला जाताच पालिकेने जुहू पोलिसांत चार जानेवारीला लेखी तक्रार दिली. मात्र, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
वाचा:
महापालिकेनं पोलिसांत तक्रार केल्यानंतर सोनू सूदनं तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. महापालिकेची नोटीस रद्द करावी किंवा तूर्तास त्यावरील कठोर कारवाईला मनाई करावी, अशा विनंती त्याने केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं सोनू सूदला तात्पुरता दिलासा दिला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times