देशातील सात राज्यात या रोगाचा संसर्ग झाल्याचा आढळून आलं होतं. केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. आता यात महाराष्ट्राचादेखील समावेश झाला आहे.
राज्यात मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या ठिकाणी या रोगाचा संसर्ग झाला आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई, ठाण्यात मोठ्या संख्येनं मृत पक्षी आढळून आले होते. त्यानंतर नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी गावातील ८०० कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनं झाल्याचं समोर आलं आहे. अन्य ठिकाणी या रोगाची लागण होऊ नये म्हणून प्रशासनानं तातडीने हालचाली सुरु केल्या असून मुरुंबा या गावासह एक किलोमीटरच्या परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले असल्याचं समजतंय. तसंच, या परिसरात कोणी जाऊ नये, असे आदेश पशुसंवर्धन विभागानं दिले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times