जालना: करोनाला हद्दपार करण्यासाठी लवकरच लसीकरण सुरू होत असताना राज्यासमोर बर्ड फ्लूच्या रूपानं नवं संकट उभं ठाकलं आहे. राज्यातील पाच जिल्ह्यात ”चा फैलाव झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री यांनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, राज्यात हाय अॅलर्ट घोषित करण्याची गरज आहे, असं मत मांडलं आहे.

वाढदिवसानिमित्तानं जालन्यात आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘बर्ड फ्लू हा अत्यंत धोकादायक आजार असून या आजाराचा मृत्यू दर १० ते १२ टक्के आहे. हे लक्षात घेता ‘बर्ड फ्लू’बाबत जास्तीत जास्त सावधानता बाळगणं गरजेचं आहे. त्यासाठी राज्यात हायअॅलर्ट जारी करायला हवा. पशुसंवर्धन व आरोग्य विभागानं तातडीनं उपाययोजना सुरू करायला हव्यात, असंही त्यांनी सांगितलं.

वाचा:

परभणीतील मुरुंबा गावात बर्ड फ्लूमुळं ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं या गावाच्या एक किलोमीटरच्या परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. जेसीबीच्या मदतीनं खड्डा खणून कोंबड्या पुरण्यात येणार आहेत. परभणी जिल्हा प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली असतानाच राज्यातील इतर जिल्ह्यातही बर्ड फ्लूनं शिरकाव केल्याचं समोर आलं आहे.

वाचा:

मुंबई, ठाण्यात कावळे व पोपट बर्ड फ्लूनं मरण पावले आहेत. कोंबड्यांच्या बाबतीत खबरदारी घेणं तुलनेनं सोपं असलं तरी कावळे व पोपटांचा संचार कसा रोखणार, असा प्रश्न आता उभा राहिला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी मांडलेलं मत अत्यंत महत्त्वाचं आहे.

करोना लसीकरण ठरल्यानुसारच!

राज्यात येत्या १६ जानेवारीपासून आधी ठरल्याप्रमाणे लसीकरणास सुरुवात होणार आहे. दररोज १० हजार कर्मचाऱ्यांना करोनाची लस दिली जाणार आहे. कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन या दोन लसींपैकी कोणती लस राज्याला मिळेल हे एक-दोन दिवसांत कळेल, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here