बुलढाणाः राज्यातील गावागावात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विजयासाठी उमेदवारांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. तर, बुलढाणातील सुटाळा बु. ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवारानं प्रचारासाठी भन्नाट मार्ग निवडला आहे.

मतदारांची मते मिळवण्यासाठी उमेदवार सतत काहीना काही शक्कल लढवत असतात. मात्र, दुसऱ्यांदा संरपच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या गीताबाई रहाटे यांनी घराच्या छतावर थेट निवडणूक चिन्हचं उभे केलं आहे. गीताबाई यांना ऑटो रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. त्यानंतर गीताबाई यांनी मुलाच्या मदतीनं घराच्या छतावरच ऑटो रिक्षा नेऊन ठेवली आहे तर सोबत एक बॅनर लावून आकर्षक सजावट देखील केली आहे.

ऑटो रिक्षा घराच्या छतावर ठेवण्यासाठी त्यांना क्रेनची मदत घ्यावी लागली आहे. ग्रामस्थाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा फंडा वापरला आहे. घराच्या छतावर ठेवलेला हा ऑटो पाहण्यासाठी गावकरीही गर्दी करतात. यावेळी गीताबाईही मत देण्याचं आवाहन करतात. रात्री गावकऱ्यांना निवडणूक चिन्ह दिसावं यासाठी आकर्षक रोषणाई केली आहे. त्यांनी बॅनरला व रिक्षाला लाइटनं सजवलं आहे.

दरम्यान, गीताबाई रहाचे निवडणूक जिंकणार का हे आगामी काळात कळेलच पण निवडणूक प्रचारासाठी त्यांनी वापरलेली ही पद्धत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या अनोखा प्रचाराचा त्यांना मतं मिळण्यासाठी फायदा होणार का? हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here