वाचा:
काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील मंत्री व नेत्यांना मिळणाऱ्या सुरक्षेविषयी आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार, आवश्यकतेनुसार, सुरक्षा कमी-अधिक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. युवा सेनेचे सचिव वरुण देसाई यांना देण्यात आलेल्या सुरक्षेवरून वादळ उठलं आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी या निर्णयावर टीका केली आहे. फडणवीस यांनीही यावर मत मांडलं आहे. ‘वरुण द्या, खालून द्या, ह्याला द्या, त्याला द्या. तुमच्या मनात असेल त्यांना सुरक्षा द्या,’ असा उपरोधिक टोला त्यांनी वरुण देसाई यांच्या सुरक्षेबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना हाणला आहे.
वाचा:
‘सुरक्षा काढणं आणि ठेवणं याचा आमच्यावर काहीही परिणाम होत नाही. आम्हाला त्याची काही चिंता नाही. आम्ही सुरक्षेविना फिरणारे लोक आहोत. आहे तेवढी सुरक्षा पुरेशी आहे. तीही काढली तरी काही फरक पडत नाही. मी प्रदेशाध्यक्ष असताना देखील एक साधा सुरक्षारक्षकही माझ्यासोबत नव्हता. मी गडचिरोलीला जायचो, सिरोंचाला जायचो. सगळीकडे जायचो. आजही सुरक्षा रक्षकाशिवाय मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकतो. त्यामुळं आमची काही तक्रार नाही. आक्षेप नाही,’ असं ते म्हणाले.
‘आमची सुरक्षा काढून ती राज्यातील महिलांना द्यावी, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तेच माझंही मत आहे. खरंतर ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष देण्याऐवजी भंडाऱ्यासारख्या घटनेवर राज्य सरकारनं अधिक लक्ष द्यायला हवं,’ असं फडणवीस म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times